Aarti Badade
सकाळी उठल्यावर तोंडात आंबट किंवा कडू चव येणे अथवा सतत आंबट ढेकर येणे ही केवळ सामान्य अॅसिडिटी नसून पचनसंस्था किंवा लिव्हर खराब होण्याचे संकेत असू शकतात.
sour burps causes
Sakal
जेव्हा पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड जास्त प्रमाणात तयार होते किंवा अन्न नीट पचत नाही, तेव्हा ते अन्ननलिकेतून वर आल्याने छातीत जळजळ आणि आंबट ढेकर सुरू होतात.
sour burps causes
Sakal
रात्री उशिरा तळलेले-मसालेदार पदार्थ खाणे, कोल्ड ड्रिंक्स, मद्यपान, घाईघाईने जेवणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपण्यामुळे पोटातील पीएच (pH) पातळी बिघडते आणि गॅस वाढतो.
sour burps causes
Sakal
काही प्रकरणांमध्ये, सतत येणारे आंबट आणि दुर्गंधीयुक्त ढेकर हे पोटातील 'एच. पायलोरी' (H. pylori) या बॅक्टेरियाच्या संसर्गाचे किंवा पोट फुगण्याचे मुख्य लक्षण असू शकते.
sour burps causes
sakal
जर आठवड्यातून अनेकदा आंबट ढेकर येत असतील आणि त्यासोबत तीव्र पोटदुखी, उलट्या, जुलाब, अचानक वजन कमी होणे किंवा अन्न गिळण्यास त्रास होत असेल, तर वेळीच सावध व्हा.
sour burps causes
Sakal
आंबट ढेकरांच्या समस्येपासून नैसर्गिक आराम मिळवण्यासाठी रोज जेवण झाल्यानंतर बडीशेप आणि खडीसाखर एकत्र चावून खा, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते व गॅस कमी होतो.
sour burps causes
Sakal
सकाळी उठल्यानंतर हलक्या कोमट पाण्यात थोडे शुद्ध मध मिसळून पिणे पोटाच्या आरोग्यासाठी आणि अॅसिड रिफ्लक्स कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
sour burps causes
Sakal
सकाळी रिकाम्या पोटी ताजे नारळाचे पाणी प्यायल्याने पोटातील वाढलेले पित्त त्वरित नियंत्रित होते, पोटाला थंडावा मिळतो आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.
sour burps causes
Sakal
Pomegranate Benefits for Acidity
Sakal