हिवाळ्यात गीझर वापरण्यापूर्वी तपासा 'या' ७ गोष्टी; अन्यथा ऐन थंडीत होईल गैरसोय!

Anushka Tapshalkar

गळती

गीझरच्या खालच्या बाजूला किंवा आजूबाजूला वारंवार पाणी साचत असेल तर टाकी लीक होत असल्याची शक्यता आहे. टाकीला गंज लागणे किंवा कनेक्शनमध्ये बिघाड होणे यामागचे कारण असू शकते.

Geyser Maintenance Tips

|

sakal

रंग बदलणे

नळातून येणारे गरम पाणी पिवळसर किंवा तपकिरी दिसत असेल आणि थंड पाणी स्वच्छ असेल तर गीझरच्या टाकीत गंज लागल्याचे संकेत असू शकतात.

Geyser Maintenance Tips

|

sakal

विचित्र आवाज येणे

पाणी गरम होताना गीझरमधून सतत कटकट किंवा पॉपिंगसारखे आवाज येत असतील तर टाकीच्या तळाशी मिनरल्सचा थर जमा झालेला असू शकतो.

Geyser Maintenance Tips

|

sakal

पाणी गरम होण्यासाठी उशीर

पूर्वीच्या तुलनेत पाणी गरम होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर हीटिंग एलिमेंटवर गाळ जमा होणे, थर्मोस्टॅट किंवा इतर तांत्रिक बिघाड कारणीभूत असू शकतो.

Geyser Maintenance Tips

|

sakal

गंजासारखा वास

गरम पाण्याला धातूसारखा किंवा गंजासारखा वास येत असेल तर गीझरच्या टाकीत गंज किंवा पाण्याच्या गुणवत्तेशी संबंधित समस्या असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नका.

Geyser Maintenance Tips

|

sakal

बिघाड होणे

गीझरमधून सतत पाणी गळत असेल किंवा तो वारंवार बंद पडत असेल तर त्यातील व्हॉल्व्ह, कनेक्शन किंवा अंतर्गत भागांमध्ये समस्या असू शकते. तंत्रज्ञाकडून तपासणी करून घ्या.

Geyser Maintenance Tips

|

sakal

वारंवार दुरुस्तीचा खर्च

गीझर वारंवार खराब होत असेल आणि दुरुस्तीचा खर्च वाढत असेल तर नवीन गीझर घ्या. टँक-स्टाइल गीझर १० ते १५ वर्षे, तर टँकलेस गीझर २० वर्षांपेक्षा जास्त टिकतात.

Geyser Maintenance Tips

|

sakal

हे लक्षात ठेवा

गीझरमधून पाणी गळत असल्यास, जळल्याचा वास येत असल्यास किंवा इलेक्ट्रिकल बिघाड जाणवत असल्यास त्याचा वापर थांबवा. स्वतः दुरुस्ती करण्याऐवजी तज्ज्ञांची मदत घ्या.

Geyser Maintenance Tips

|

sakal

NVIDIAचा प्रवास; गेमिंगपासून AI पर्यंत!

आणखी वाचा