Monika Shinde
बाथरूममध्ये लावलेला गीझरही फटू शकतो, ज्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. चला जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे.
गीझर सुरू केल्यानंतर विसरण्याची सवय असेल तर ती बदलावी, कारण यामुळे गीझर फुटू शकतो.
गीझरमध्ये काही खराबी असेल तर त्वरित दुरुस्ती करा. न केल्यास गीझर फुटण्याचा धोका वाढतो.
गीझरची नियमित सर्व्हिसिंग आणि स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. जर ही काळजी घेतली नाही तर गीझर फटण्याची शक्यता जास्त असते.
वायरिंगमध्ये काही समस्या असल्यास त्वरित दुरुस्त करा. न केल्यास करंट लागू शकतो.
पाणी गळती होत असेल तर लगेच दुरुस्त करा. पाणी जर वायरिंगच्या संपर्कात आले तर करंट लागण्याचा धोका असतो.
जुने गीझर असल्यास खराब होण्याची शक्यता जास्त असते. जर कोणताही पार्ट खराब असेल तर त्वरित बदलावा.