सकाळ डिजिटल टीम
वास्तूशास्त्रानुसार घरातील घड्याळाची दिशा कोणती असावी. तसेच योग्य दिशेला घड्याळ लावने महत्वाचे का मानले जते जाणून घ्या.
वास्तूशास्त्रानुसार, घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. पूर्व दिशेला घड्याळ लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. या दिशेमुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात प्रगती होते. असे मानले जाते.
पूर्व दिशेप्रमाणेच उत्तर दिशा देखील घड्याळ लावण्याकरिता उत्तम मानली जाते. ही दिशा संपत्तीचे प्रतीक आहे. या दिशेला घड्याळ लावल्याने आर्थिक प्रगती होते आणि घरातील वातावरण सकारात्मक राहते. अशी मान्यता आहे.
पश्चिम दिशेला घड्याळ लावणे वास्तूशास्त्रानुसार ठीक मानले जाते, पण ते पूर्व किंवा उत्तर दिशेसारखे शुभ मानले जात नाही. या दिशेमुळे नवीन संधी मिळू शकतात, पण जास्त यश मिळवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशाच चांगली मानली जाते.
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर चुकूनही घड्याळ लावू नये. ही दिशा यमाची मानली जाते आणि या दिशेला घड्याळ लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या आणि घरातील लोकांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात.
कोणत्याही दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा समोरच्या भिंतीवर घड्याळ लावू नये. वास्तूशास्त्रानुसार, दरवाजातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर या घड्याळाखालील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.
घड्याळ नेहमी डोळ्यासमोर स्पष्ट दिसेल अशा उंचीवर लावावे. खूप खाली किंवा खूप वर लावलेले घड्याळ योग्य मानले जात नाही.
घरात कधीही बंद पडलेले किंवा तुटलेले घड्याळ ठेवू नये. असे घड्याळ नशिबासाठी अशुभ मानले जाते आणि ते घरातील प्रगती थांबवते.
घड्याळाची वेळ नेहमी योग्य आणि अचूक असावी. घड्याळ वेळेच्या मागे किंवा पुढे असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होवू शकतो.