नैसर्गिक ग्लोसाठी हिवाळ्यात 'हा' एक पदार्थ लावा अन् मिळवा 5 फायदे

Aarti Badade

हिवाळ्यात त्वचा का होते खराब?

थंडीत हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि खरबरीत होते. गरम पाण्याने अंघोळ आणि हीटरचा वापर यांमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते.

Benefits of ghee for skin

|

Sakal

'आयुर्वेदिक' खजिना

"महागड्या स्किनकेअर उत्पादनांपेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील शुद्ध देसी गाईचे तूप त्वचेसाठी अधिक प्रभावी ठरते. आयुर्वेदानुसार, तूप त्वचेचे खोलवर पोषण करते."

Benefits of ghee for skin

|

Sakal

जीवनसत्त्वांचा पॉवरहाऊस

तुपामध्ये व्हिटॅमिन A, D, E, K आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक त्वचेला मऊ, कोमल आणि तरुण ठेवण्यास मदत करतात.

Benefits of ghee for skin

|

Sakal

नैसर्गिक मॉइश्चरायझर

बाजारातील मॉइश्चरायझर्स केवळ वरचा थर मऊ करतात, पण तूप त्वचेच्या आत शिरून नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते. यामुळे त्वचेतील कोरडेपणा मुळापासून संपतो.

Benefits of ghee for skin

|

Sakal

अँटी-एजिंग गुणधर्म

नियमितपणे चेहऱ्यावर तूप लावल्याने सुरकुत्या, बारीक रेषा आणि काळे डाग कमी होतात. हे त्वचेला 'फ्री-रॅडिकल्स'पासून वाचवते आणि अकाली वृद्धत्व रोखते.

Benefits of ghee for skin

|

Sakal

जळजळ आणि खाज

थंडीमुळे त्वचेला खाज सुटणे किंवा लालसरपणा येणे सामान्य आहे. तूप लावल्याने त्वचेची जळजळ शांत होते. एक्झिमा आणि सोरायसिस सारख्या समस्यांतही हे फायदेशीर ठरू शकते.

Benefits of ghee for skin

|

Sakal

टाच आणि ओठांची काळजी

फाटलेल्या टाचा आणि कोरडे पडलेले ओठ यांवर तूप लावणे हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला यशस्वी उपाय आहे. रात्री झोपताना तूप लावल्यास त्वचा वेगाने रिपेअर होते."

Benefits of ghee for skin

|

Sakal

कोणाला धोका असू शकतो?

ज्यांची त्वचा आधीच खूप तेलकट आहे किंवा ज्यांना पिंपल्सचा त्रास आहे, त्यांनी तूप वापरताना काळजी घ्यावी, कारण यामुळे पोअर्स ब्लॉक होऊ शकतात. इतरांसाठी हे वरदान आहे!

Benefits of ghee for skin

|

Sakal

वजन कमी करायचंय? मग आहारात करा 'हे' छोटे बदल; जिम न लावताही घटेल चरबी!

Weight loss diet plan

|

Sakal

येथे क्लिक करा