वजन कमी करायचंय? मग आहारात करा 'हे' छोटे बदल; जिम न लावताही घटेल चरबी!

Aarti Badade

वेट लॉससाठी डाएटचा रोल

वजन कमी करण्यासाठी ८०% वाटा हा तुमच्या आहाराचा असतो. योग्य खाण्या-पिण्याच्या सवयी अंगीकारल्या तर वजन नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते.

Weight loss diet plan

|

Sakal

पालेभाज्या आणि फळांचा वापर

तुमच्या रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे आणि सॅलडचा समावेश करा. यात फायबर जास्त असल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि सारखी भूक लागत नाही.

Weight loss diet plan

|

Sakal

प्रथिनांचे महत्त्व

अंडी, पनीर, डाळी आणि दही यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा. प्रोटीनमुळे मेटाबॉलिझ्म (Metabolism) वेगवान होतो, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज लवकर जळतात.

Weight loss diet plan

|

Sakal

मिलेट्स आणि संपूर्ण धान्य

मैद्याचे पदार्थ टाळून ओट्स, ब्राऊन राईस आणि मल्टीग्रेन रोटी निवडा. हे पदार्थ हळूहळू पचत असल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि भूक नियंत्रित राहते.

Weight loss diet plan

|

Sakal

'हे' पदार्थ पूर्णपणे टाळा!

जंक फूड, तळलेले पदार्थ, समोसे, वडापाव किंवा जास्त तेलकट पदार्थ खाणे बंद करा. या पदार्थांमध्ये बॅड फॅट्स जास्त असतात, जे वेगाने वजन वाढवतात.

Weight loss diet plan

|

Sakal

साखरेचा धोका ओळखा

गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेज्ड ज्यूसपासून दूर राहा. यात साखरेचे प्रमाण प्रचंड असून पोषण शून्य असते, ज्यामुळे पोटाचा घेरा वाढतो.

Weight loss diet plan

|

Sakal

भरपूर पाणी आणि वेळेवर जेवण

दिवसभर किमान ३-४ लिटर पाणी प्या. तसेच जेवणाची वेळ निश्चित ठेवा. यामुळे पचन सुधारते आणि ओव्हरईटिंगची (Overeating) समस्या दूर होते.

Weight loss diet plan

|

Sakal

केवळ डाएट पुरेसे नाही!

योग्य आहारासोबतच दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा आणि ७-८ तासांची झोप पूर्ण घ्या. शिस्तबद्ध जीवनशैलीच तुम्हाला फिट ठेवू शकते.

Weight loss diet plan

|

Sakal

केस गळतीला ब्रेक! टक्कल पडण्याआधीच करा ‘ही’ 5 योगासने

Yoga for Scalp Health hair growth

|

Sakal

येथे क्लिक करा