मधुमेह असूनही तूप खाताय? डॉक्टरांचे मत जाणून घ्या!

Aarti Badade

पारंपारिक आहाराचे महत्त्व

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी देशी तूप का फायदेशीर आहे, हे स्पष्ट करत पारंपारिक भारतीय खाद्यसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

ghee good for diabetes

|

Sakal

'ग्लायसेमिक इंडेक्स' होतो कमी

गव्हाच्या चपातीला किंवा भाकरीला थोडे देशी तूप लावल्यास संपूर्ण जेवणाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' (रक्तातील साखर वाढवण्याचा वेग) कमी होतो.

ghee good for diabetes

|

Sakal

रक्तातील साखर राहते नियंत्रित

तूप हे कर्बोदकांसोबत (Carbs) खाल्ल्यास पचनक्रिया किंचित मंदावते, ज्यामुळे रक्तातील साखर एकदम न वाढता हळूहळू आणि नियंत्रित राहण्यास मदत होते.

ghee good for diabetes

|

Sakal

व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत

भारतीय स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या शुद्ध देशी तूपामध्ये अ-जीवनसत्त्व (Vitamin A) आणि निरोगी फॅट्स असतात, जे शरीराला इतर आवश्यक जीवनसत्त्वे शोषून घेण्यास मदत करतात.

ghee good for diabetes

|

Sakal

आयुर्वेदाचे मत

आयुर्वेदानुसार, शुद्ध तूप पचनक्रिया सुधारण्यास, शरीरातील अंतर्गत जळजळ (Inflammation) कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास अत्यंत फायदेशीर मानले जाते.

ghee good for diabetes

|

Sakal

खरा शत्रू तूप नसून 'हे' पदार्थ आहेत

खरी समस्या तुपात नाही; तर अति-प्रक्रिया केलेल्या मैद्याच्या, पाकीटबंद पदार्थांच्या सेवनात आणि असंतुलित जीवनशैलीत आहे.

ghee good for diabetes

|

Sakal

प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक

तूप फायदेशीर असले तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच (उदा. वरण-भातावर एक लहान चमचा) करावे. विशेषतः हृदयविकार किंवा कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ghee good for diabetes

|

Sakal

लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची दिसतात 'ही' प्रमुख लक्षणे!

Childhood Kidney Cancer

|

Sakal

येथे क्लिक करा