Ghibli चा नाद खुळा, सचिनपासून ईलॉन मस्कला लागलं नवं वेड

सकाळ डिजिटल टीम

Ghibli-Style AI ट्रेंडने धुमाकूळ घातला!

OpenAI च्या GPT-4o तर्फे Ghibli-style AI इमेजेस निर्माण केल्या जात आहेत, ज्यामुळे हा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

Sachin Tendulkar Ghibli-Style AI Trend | Sakal

सॅम अल्टमन यांचा सहभाग

OpenAI CEO सॅम अल्टमन यांनी X वर आपल्या प्रोफाइल पिक्चरची Ghibli-style आवृत्ती शेअर केली आणि या ट्रेंडमध्ये सामील झाले.

Sam Altman | Sakal

सचिन तेंडुलकरचा AI इमेज

सचिन तेंडुलकर यांनी 2011 क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतरच्या ऐतिहासिक क्षणाचा Ghibli-शैलीतील AI फोटो शेअर करत, “AI सा कूछ ट्रेंड हो रहा है!” असे लिहिले.

Sachin Tendulkar Ghibli-Style AI Trend | Sakal

इलोन मस्क

X चे CEO इलोन मस्क यांनी ‘द लायन किंग’ मधील रफीकीच्या भूमिकेत स्वतःचा Ghibli-style AI इमेज शेअर केला.

Elon Musk | Sakal

भारतीय बिजनेसमैन सहभागी!

Paytm संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीही आपल्या प्रोफाइल पिक्चरला Ghibli-style AI इमेजमध्ये बदलले.

Vijay Shekhar Sharma | Sakal

राजकीय नेतेही या ट्रेंडमध्ये सामील!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घिब्ली स्टाइल फोटो शेअर करत, “टेक्नोलॉजी जस्ट डज नॉट स्टॉप सरप्राइजिंग अस प्लेजंटली!” असे कॅप्शन दिले.

Chief Minister Devendra Fadnavis & Prime Minister Narendra Modi. | Sakal

ब्रँड्सनीही केला सहभाग

Airbus ने आपल्या Beluga XL विमानाचा घिब्ली शैलीतील AI चित्र शेअर केले आणि कॅप्शन दिले, “घिब्ली स्टोरीज हॅव अलवेज सेलिब्रेटेड फ्लाइट”

Beluga Airbus | Sakal

India Post चा अनोखा सहभाग

India Post ने देखील आपल्या टपाल वितरकांचे Ghibli-style AI चित्र शेअर करून हा ट्रेंड आणखी वाढवला.

India Post | Sakal

डार्क चॉकलेट खाल्याने त्वचेला मिळतात 'हे' 8 फायदे

Skin Benefits of Eating Dark Chocolate | Sakal
येथे क्लिक करा