Aarti Badade
मुलींमध्ये जास्त किंवा कमी वजन असणे, दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. निरोगी वजन राखणे महत्त्वाचे आहे.
जास्त वजनामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि काही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
अतिरिक्त वजनामुळे सांध्यांवर ताण येऊन दुखणे सुरू होते. तसेच, मुलींमध्ये नैराश्य आणि आत्म-सन्मान कमी होण्याची शक्यता असते.
कमी वजनामुळे कुपोषण, अशक्तपणा आणि आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते.
कमी वजनामुळे मासिक पाळी अनियमित होते किंवा थांबते, गर्भधारणेत अडचणी येतात. तसेच, हाडे कमजोर होऊन फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
कमी वजनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे संसर्ग (इन्फेक्शन) होण्याची शक्यता वाढते.
संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वजन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जास्त असो वा कमी, दोन्ही प्रकारचे वजन आरोग्यासाठी हानिकारक आहे. निरोगी आणि संतुलित वजनच उत्तम आरोग्य देते.