Aarti Badade
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी '१०-१०-१० नियम' हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो.
मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी एक व्यावहारिक जीवनशैली मार्गदर्शक आहे.
जेवणापूर्वी १० मिनिटे थांबा; रक्तातील साखर तपासा, एक ग्लास पाणी प्या किंवा श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करा. यामुळे जास्त खाणे टाळता येते.
जेवणानंतर १० मिनिटे चालण्यासारखी हलकी शारीरिक हालचाल करा. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि ग्लुकोज वाढ कमी होते.
दररोज १० मिनिटे आपल्या जीवनशैलीच्या सवयींचा आढावा घ्या. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि हायड्रेशन तपासणे आवश्यक.
जेवणानंतर चालल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची वाढ नियंत्रित होते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
विशेषतः टाइप २ मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधकता (Insulin Resistance) असलेल्या लोकांसाठी हा नियम खूप फायदेशीर आहे.
या नियमामुळे तुम्हाला तुमच्या दिनचर्येचा साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे समजण्यास मदत होते आणि निरोगी निवडी करण्यास प्रोत्साहन मिळते.