Aarti Badade
नेहमीचे पोहे-उपमा खाऊन कंटाळा आला असल्यास वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला भरपूर पोषण देण्यासाठी हिरव्या मुगाचा डोसा उत्तम पर्याय आहे.
Healthy Moong Dal Paneer Stuffed Dosa
Sakal
हा पौष्टिक डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या वाटीत हिरवे मूग, थोडे तांदूळ आणि मेथी दाणे ५ ते ६ तासांसाठी पाण्यात चांगले भिजत ठेवावे.
Moong Dal Dosa
Sakal
भिजवलेले मूग-तांदूळ स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि मीठ घालून थोडे पाणी टाकून घट्टसर वाटून घ्यावे.
Moong Dal Dosa
Sakal
एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, बारीक चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र करून चवदार स्टफिंग तयार करावे.
Moong Dal Dosa
Sakal
डोशाचा तवा गॅसवर कडक गरम करून त्याला थोडे तेल लावावे आणि मुगाचे तयार पीठ तव्यावर चमच्याच्या साहाय्याने गोलाकार पसरवावे.
Moong Dal Dosa
Sakal
डोसा एका बाजूने चांगला भाजून कुरकुरीत झाल्यावर त्यावर तयार केलेले पनीर-भाज्यांचे मिश्रण पसरवून डोसा दोन्ही बाजूंनी फोल्ड करावा.
Moong Dal Dosa
Sakal
तयार झालेला गरमागरम आणि कुरकुरीत मुगाचा पनीर स्टफ्ड डोसा तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसोबत खाण्याचा आनंद घेऊ शकता.
Moong Dal Dosa
Sakal
Milk and Ghee Benefits for stomach
Sakal