Faral Decoration Ideas: दिवाळी फराळाला द्या ग्लॅमरस टच! असं सजवा फराळाचं ताट

Anushka Tapshalkar

फराळाच्या ताटाची सजावट

फराळाचे ताट तांबे, चांदी, चिनीमाती, किंवा काचेचे घ्यावे. त्याने त्यातील पदार्थ खुलून दिसतात.

Diwali Faral Garnishing Ideas

|

sakal

चकली + दही + अननस

अननसाच्या बारीक फोडी, गोड किंवा खारी बुंदी आणि दही हे एकत्र करून त्यासोबत चकली खाण्यास द्या. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरचीही घालून देऊ शकता.

Diwali Faral Garnishing Ideas

|

sakal

चकली चाट / चीज-चकली

चकलीवर दही आणि टोमॅटोचे तुकडे ठेवून चाट मसाला भुरभुरवा किंवा चीज किसून सजवा; ही चकली अतिशय स्वादिष्ट लागते. प्लेटमध्ये चार चकल्या ठेवा, मध्ये त्रिकोणी चीज स्लाईस आणि हिरवी चटणीसह सर्व्ह करा.

Diwali Faral Garnishing Ideas

|

sakal

कडबोळी

कडबोळी सर्व्ह करताना प्लेटच्या मधे ओल्या खोबऱ्याचा चव ठेवून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी आणि त्याच्या बाजूने कडबोळी सजवून ठेवावीत.

Diwali Faral Garnishing Ideas

|

sakal

गोड व खारी शंकरपाळी

गोड शंकरपाळी खारवलेल्या काजूसोबत, खाऱ्या शंकरपाळ्या सर्व्ह करताना प्लेटमध्ये बाजूला सफरचंदाच्या फोडी कलात्मकदृष्ट्या सजवून ठेवाव्यात व त्यावर मिरची पावडर भुरभुरावी.

Diwali Faral Garnishing Ideas

|

sakal

शेवेला ग्लॅमरस टच

तिखट शेवेवर डाळिंब दाणे व काळे मीठ शिंपडून, पिवळी, साधी शेव सर्व्ह करताना तळलेले काजू, थोडा चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.अ

Diwali Faral Garnishing Ideas

|

sakal

असा सजवा चिवडा

पोह्याचा चिवडा देताना त्यावर किसलेले पनीर आणि बदामाचे तुकडे घालून सजवावे. मक्‍याचा चिवडा देताना काकडीच्या लांब तुकड्यांनी सजवून ठेवावे आणि वरून सुक्‍या खोबऱ्याची चव घालावी.

Diwali Faral Garnishing Ideas

|

sakal

चुरमुऱ्याचा चिवडा

चुरमुऱ्याचा चिवडा सर्व्ह करताना त्याच्या बाजूला शहाळ्याचे खोबरे ठेवून त्यावर बारीक पिवळी शेव भुरभुरावी.

Diwali Faral Garnishing Ideas

|

sakal

लाडू ते बर्फी: डेसर्ट सजवण्याच्या सोप्या आणि रॉयल टिप्स

Diwali Mithai Decoration Ideas

|

sakal

आणखी वाचा