काचेचा थर्मामीटर फुटला अन् पारा पोटात गेला तर काय होईल?

Shubham Banubakode

काचेचा थर्मामीटर

काही घरांमध्ये आजही ताप मोजण्यासाठी काचेच्या थर्मामीटरचा वापर होतो. पण जर ते फुटलं आणि पारा पोटात गेला तर काय होईल?

What happens if mercury from a glass thermometer is accidentally swallowed

|

esakal

पारा गिळल्यास काय?

थर्मामीटरमधला धातूचा पारा शरीरात फार कमी प्रमाणात शोषला जातो. त्यामुळे थोडा पारा गिळल्याने लगेच विषबाधा होण्याची शक्यता कमी असते.

What happens if mercury from a glass thermometer is accidentally swallowed

|

esakal

विषारी धातू

पारा विषारी धातू आहे. त्यामुळे तो सुरक्षित समजण्याची चूक करू नये. अशी घटना घडल्यास खबरदारी घेणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

What happens if mercury from a glass thermometer is accidentally swallowed

|

esakal

धोकादायक वायू

पारा गिळण्यापेक्षा त्याचे वायू श्वासातून शरीरात जाणं अधिक धोकादायक असतं. म्हणून सांडलेला पारा हाताने किंवा चुकीच्या पद्धतीने साफ करू नये.

What happens if mercury from a glass thermometer is accidentally swallowed

|

esakal

पाऱ्याचे कण

पारा सांडल्यावर झाडू किंवा व्हॅक्यूम क्लीनर वापरू नका. त्यामुळे पाऱ्याचे छोटे कण हवेत मिसळू शकतात.

What happens if mercury from a glass thermometer is accidentally swallowed

|

esakal

डॉक्टरांकडे जा

थर्मामीटर फुटताना काचेचे तुकडे तोंडात जाऊ शकतात. जीभ, तोंड किंवा घशाला दुखापत झाली, रक्त आलं तर तातडीने डॉक्टरांकडे जा.

What happens if mercury from a glass thermometer is accidentally swallowed

|

esakal

स्वच्छ पाणी

तोंड स्वच्छ पाण्याने नीट धुवा आणि पाणी थुंकून टाका. डॉक्टरांना थर्मामीटरमधला पारा गिळल्याचं स्पष्टपणे सांगा.

What happens if mercury from a glass thermometer is accidentally swallowed

|

esakal

थर्मामीटर फुटलं तर?

बाळं आणि पाळीव प्राणी दूर ठेवा, पाऱ्याला हात लावू नका आणि शक्य असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या. तब्येत बिघडल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

What happens if mercury from a glass thermometer is accidentally swallowed

|

esakal

लोअर, मिडल की अपर बर्थ? सीटखाली सामान ठेवण्याचा अधिकार कुणाचा?

Indian Railways Lower Berth Rule

|

esakal

हेही वाचा -