सकाळ डिजिटल टीम
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ग्लेन फिलिप्स आपल्याला मैदानावर अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळतो.
तो त्याच्या भन्नाट फिल्डींगसाठी प्रसिद्ध आहे.
हवेत झेपावत फिलिप्सने अनेक झेल पकडले आहेत.
त्याच्या या हवेत उडी मारत झेल पकडण्याच्या स्टाईलमुळे त्याला सोशल मीडियावर फ्लाईंग फिलिप्स देखील म्हणतात.
या २८ वर्षीय क्रिकेटपटूचा तुम्ही फिटनेस पाहिलाय काय?
त्याच्या या उत्तम फिटनेसमुळे तो मैदानावर आपल्याला नेहमीच अॅक्टीव्ह पाहायला मिळतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिटनेस मॉडेल म्हणून विराट कोहलीचे नाव आग्रही असते.
त्याचबरोबर आफ्रिकन फलंदाज फाफ ड्यू प्लेसिसचा फिटनेस देखील उत्तम आहे.
या दोन दिग्गजांच्या फिटनेसोबत आता ग्लेन फिलिप्सच्या फिटनेसची देखील बरोबरी केली जात आहे.