Anushka Tapshalkar
कोरियन स्किन केअरमध्ये सर्वात पहिला फोकस हायड्रेशनवर असतो. महागडे प्रॉडक्ट्स किंवा मेकअप नव्हे, तर त्वचेला पुरेसं पाणी मिळणं हेच हेल्दी स्किनचं खऱ्या अर्थाने गुपित मानलं जातं.
Korean Glass Skin Top Secret
ड्राय स्किन म्हणजे तेलाची कमतरता, तर डिहायड्रेटेड स्किन म्हणजे पाण्याची कमतरता. त्वचेला पाणी देणं म्हणजे हायड्रेशन, आणि ते पाणी त्वचेत लॉक करणं म्हणजे मॉइश्चरायझेशन.
Korean Glass Skin Top Secret
कोरियन स्किन केअरमध्ये आधी हायड्रेटिंग टोनर, एसेंस किंवा हलके सीरम वापरले जातात. त्यानंतर मॉइश्चरायझर लावून ते पाणी त्वचेत लॉक केलं जातं.
Korean Glass Skin Top Secret
त्वचेचा बॅरियर मजबूत असेल तरच स्किन संवेदनशील होत नाही, लालसरपणा किंवा पिंपल्स कमी होतात. हा बॅरियर टिकवण्यासाठी योग्य हायड्रेशन खूप गरजेचं असतं.
Korean Glass Skin Top Secret
एक जाड क्रीम लावण्याऐवजी कोरियन रूटीनमध्ये हलक्या प्रॉडक्ट्सचे अनेक लेयर्स लावले जातात. त्यामुळे त्वचा जास्त चांगल्या प्रकारे हायड्रेट होते.
Korean Glass Skin Top Secret
sakal
कोरियन स्किन केअरमध्ये सुरुवातीपासूनच त्वचेला हायड्रेट ठेवण्याची सवय असते. त्यामुळे सुरकुत्या, कोरडेपणा आणि इतर समस्या उशिरा दिसतात.
दररोज त्वचेला हायड्रेशन देणं, हलक्या लेयर्स लावणं आणि स्किन बॅरियर जपणं — या छोट्या सवयींमुळे त्वचा नैसर्गिकरीत्या हेल्दी आणि ग्लोइंग दिसते.
Small Habits, Big Results
sakal