बिचेस विसरा… शिवरायांचा अभिमानास्पद इतिहास सांगणारी गोव्यातील ठिकाणे पाहिली का?

Sandip Kapde

प्रवास

गोव्यात समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वेगळा इतिहास अनुभवायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या भूमीला भेट देणे अधिक अर्थपूर्ण ठरते.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

दहशत

शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे गोव्यातील पोर्तुगीज सत्तेला कायमची धास्ती बसली होती आणि त्यांच्या पत्रांमधून ही भीती स्पष्ट दिसते.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

आरमार

कल्याणपासून कोकण किनाऱ्यापर्यंत उभारलेले शिवरायांचे बलाढ्य आरमार गोव्यासमोरील समुद्रात पोर्तुगीजांसाठी मोठे आव्हान ठरले.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

डिचोली

गोव्यातील डिचोली येथे शिवाजी महाराजांनी तळ ठोकून राजकीय व लष्करी परिस्थितीचा सखोल अभ्यास केला होता.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

बारदेश

बारदेशमध्ये स्वारी करून शिवरायांनी पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचारांना थेट आव्हान दिले आणि हिंदूंना दिलासा दिला.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

तह

शिवाजी महाराजांच्या ताकदीपुढे नमते घेत पोर्तुगीजांनी गोव्यात महाराजांशी तह करण्यास भाग पाडले गेले.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

सप्तकोटीश्वर

डिचोलीजवळील सप्तकोटीश्वर महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून शिवरायांनी गोमंतक भूमीतील सांस्कृतिक अस्मितेला राजाश्रय दिला.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

सीमा

रामाचे भूशिर, सिंधुदुर्ग आणि बेतुलसारख्या ठिकाणांमधून शिवाजी महाराजांनी गोव्यात पोर्तुगीजांना स्पष्ट सीमारेषा आखून दिली.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

स्वारी

गोव्याच्या समुद्रातूनच युद्धनौका घेऊन बसरूरवर स्वारी करणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे ठरले.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

न्याय

बारदेश मोहिमेत पकडलेल्या स्त्रिया व मुलांना सन्मानाने मुक्त करून शिवरायांनी शत्रूंसाठीही मानवतेचा आदर्श ठेवला.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

व्यापार

गोव्यातील पोर्तुगीज व्यापाराला शह देत शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या समुद्री हद्दीत स्वतंत्र व्यापारनीती राबवली.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

वारसा

आज गोव्यात फिरताना शिवाजी महाराज ज्या ठिकाणी राहिले, लढले आणि देवालयांना संरक्षण दिले, ती स्थळे गोमंतक इतिहासाचा अभिमानास्पद वारसा सांगतात.

Chhatrapati Shivaji maharaj

|

esakal

शिवरायांच्या कपाळावरील गंध नेमकं कसं होतं? खऱ्या चित्राचा उलगडा! इतिहासातील सर्वात मोठा शोध

Shivaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा