Sandip Kapde
शिवरायांच्या कपाळावरील गंध हा इतिहासप्रेमींना चकित करणारा एक रहस्यमय विषय मानला जातो.
Shivaji Maharaj
esakal
गंध नेमका उभा, आडवा, गोल की चंद्रकोर असा होता, यावर सतत चर्चा होत असते.
Shivaji Maharaj
esakal
शिवछत्रपती कपाळावर कोणत्या प्रकारचा टिळा किंवा गंध लावत असत, याबद्दल विविध मते आहेत.
Shivaji Maharaj
esakal
हिंदू परंपरेत शिव, विष्णू, शक्ती उपासकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे टिळे आणि गंध लावण्याची प्रथा दिसते.
Shivaji Maharaj
esakal
अनेक पुजारी आणि सामान्य भक्तही आपल्या दैनंदिन जीवनात कपाळावर गंध लावताना दिसतात.
Shivaji Maharaj
esakal
चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये शिवरायांच्या कपाळावर विविध प्रकारचे तिळे दाखवले गेल्याने जनमानसात अनेक कल्पना निर्माण झाल्या.
Shivaji Maharaj
esakal
काही भक्तांनी चंद्रकोरीच्या आकाराचा तिळा ‘शिवगंध’ म्हणून ओळख देत तो मोठ्या प्रमाणात प्रसारित केला.
Shivaji Maharaj
esakal
तथापि, खरा प्रश्न असा उरतो की शिवराय प्रत्यक्षात गंध लावत होते की नाही.
Shivaji Maharaj
esakal
महाराजांचे एक समकालीन असे जुने चित्र त्यांच्या कपाळावरील गंधाबाबत महत्त्वपूर्ण पुरावा ठरते.
Shivaji Maharaj
esakal
या चित्रात शिवरायांच्या कपाळावर तीन आडव्या शुभ्र पट्ट्यांचे त्रिपुंड गंध स्पष्ट दिसतो.
Shivaji Maharaj
esakal
जर हे चित्र १६६९ सालचे असल्याचे सिद्ध झाले तर ते महाराजांच्या हयातीतील सर्वात पहिले रंगीत आणि समकालीन चित्र ठरेल.
Shivaji Maharaj
esakal
वडगाव मठातील जयराम स्वामीं यांच्यासोबत असलेल्या या चित्रावरून असा निष्कर्ष निघतो की शिवराय कपाळावर त्रिपुंडाच्या स्वरूपातील शुभ्र गंध लावत असावेत. (छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो)
Shivaji Maharaj
esakal
मराठेशाही प्रवीण भोसल या युट्यूब चॅनलवर ही माहिती देण्यात आली आहे.
Shivaji Maharaj
esakal