सकाळ वृत्तसेवा
मुघल बादशहा धर्माने मुस्लिम असूनही तो गोपुजा करायचा. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
तो मुघल बादशहा होता अकबर. अकबराने त्याच्या काळात दीपावलीदेखील साजरी केली होती.
अबूल फजल याने आपल्या पुस्तकामध्ये याबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे.
अकबर हा तसा सहिष्णू प्रवृत्तीचा बादशहा होता. त्याने धर्मचिकित्साही केली होती.
जेव्हा अकबर बादशहा काश्मीरमध्ये असायचा तेव्हा तो दिपावली साजरी करायचा आणि गोपूजाही करायचा.
दिपावली साजरी करण्यासाठी अकबराचे आदेश निघायचे आणि त्याप्रमाणे तयारी केली जायची
दिवाळीच्या काळात गोपुजा केली जायची, महलामध्ये जुगार खेळला जायचा.
एवढंच नाही तर गायींना आंघोळ घालून, त्यांना सजवून पूजा व्हायची.