गोवा IN पावसाळा... पर्यटकांपासून लपलेलं हे ठिकाण भारीच! तुम्हालाही मोहात पाडेल!

Vinod Dengale

मंदिर

गोवा फक्त बीच म्हणजेच समुद्रकिनाऱ्यासाठी नाहीतर या एका मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.

Temple

|

eSakal

तांबडी सुर्ला

गोव्याच्या घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेलं सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक महादेव मंदिर मोळेमजवळील तांबडी सुर्ला येथे आहे.

Tambadoi Surla

|

eSakal

स्थापत्य

हे मंदिर बाराव्या शतकात जैन स्थापत्यशैलीच्या प्रभावातून बांधले गेल्याचे मानले जाते.

architecture

|

eSakal

आध्यात्मिक

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर, हिरव्यागार जंगलात वसलेल्या या मंदिरातील सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरण तुम्हाला नक्कीच थक्क करेल.

Spirituap

|

eSakal

भगवान शिव

हे मंदिर भगवान महावीर नॅशनल पार्क परिसरात असून काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेले हे छोटे, सुंदर नक्षीकाम असलेले आणि प्रमाणबद्ध मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे.

Shiv Temple

|

eSakal

सौंदर्य

पावसाळ्यात परिसर हिरवागार होतो आणि जंगल, धबधबे व मंदिराचं प्राचीन सौंदर्य पाहण्यासारखं दिसतं.

Beauty

|

eSakal

रचना

मंदिराची रचना पूर्वाभिमुख असून, सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची किरणे थेट शिवलिंगावर पडतील, अशा पद्धतीने त्याची उभारणी करण्यात आली आहे.

Temple Structure

|

eSakal

सुर्ला नदी

मंदिराजवळून सुर्ला नदी वाहते आणि या नदीच्या उगमाच्या ठिकाणी पाण्यात उतरून तुम्ही थंडगार आणि शुद्ध पाण्याचा अनुभव घेता येतो.

Surla River

|

eSakal

150 वर्षांपूर्वी ‘पुणे’ कसं दिसायचं? पाहा हे दुर्मिळ फोटो!

150 Years Ago, What Did Pune Look Like?

|

History With RBK 

हेही वाचा