Aarti Badade
झोपेत स्वप्न पडणे ही एक नैसर्गिक क्रिया पण जेव्हा स्वप्नात प्रत्यक्ष देव किंवा एखादे संत दर्शन देतात, तेव्हाअनेक प्रश्न निर्माण होतात. याचे उत्तर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी दिले आहे.
God in Dreams mean Premanand Maharaj explains
Sakal
१. सात्विक: ज्यामध्ये देव किंवा महापुरुष दिसतात. २. राजसिक: ज्यामध्ये आपण सुखांचा आनंद घेतो. ३. तामसिक: ज्यामध्ये भांडणे किंवा वाईट दृश्ये दिसतात.
God in Dreams mean Premanand Maharaj explains
sakal
जर तुमच्या स्वप्नात देव, एखादी दैवी प्रतिमा किंवा संत येत असतील, तर त्याला सात्विक स्वप्न मानले जाते. महाराजांच्या मते, हे तुमच्यावर असलेल्या ईश्वरी आशीर्वादाचे लक्षण आहे.
God in Dreams mean Premanand Maharaj explains
Sakal
अनेक लोक स्वप्नाचा अर्थ शोधण्यात वेळ घालवतात. पण महाराज म्हणतात, "देव स्वप्नात येऊन काय सांगू इच्छितो, याचा विचार करणे निरुपयोगी आहे." याला केवळ एक कृपा म्हणून स्वीकारावे.
God in Dreams mean Premanand Maharaj explains
Sakal
स्वप्नात संतांचे किंवा देवाचे दर्शन होणे, हे तुमच्या पुण्य कर्मांचे फळ आहे. तुमच्या मनातील सात्विकता आणि भक्तीमुळेच तुम्हाला अशी स्वप्ने पडतात, असा त्याचा साधा अर्थ होतो.
God in Dreams mean Premanand Maharaj explains
Sakal
प्रेमानंद महाराजांच्या मते, स्वप्नांचा कोणताही भविष्यकालीन सकारात्मक किंवा नकारात्मक अर्थ लावू नये. "ते फक्त एक स्वप्न आहे" असे समजून विसरून जावे आणि भगवंताच्या नामात लक्ष द्यावे.
God in Dreams mean Premanand Maharaj explains
Sakal
महाराज नेहमी सांगतात की, कलियुगात फक्त 'नामजप' हेच अंतिम सत्य आहे. स्वप्नांच्या मागे न धावता जागृत अवस्थेत जास्तीत जास्त नामस्मरण करणे हेच मानवाचे कर्तव्य आहे.
God in Dreams mean Premanand Maharaj explains
Sakal
शेवटी, स्वप्नात देव दिसल्याने हुरळून न जाता किंवा घाबरून न जाता, आपली साधना आणि भक्ती सुरू ठेवावी. ईश्वराचे दर्शन स्वप्नात होणे ही भाग्याची गोष्ट आहे, पण ध्येय हे प्रत्यक्ष भेटीचे असावे.
God in Dreams mean Premanand Maharaj explains
Sakal
Snowfall in India January
Sakal