NAVRATRI 2025 : राशीनुसार करा दुर्गेच्या या रूपांची पूजा; तुमच्या राशीची देवी कोणती घ्या जाणून

kimaya narayan

ज्योतिष

नवरात्रीचा सण सुरु झाला आहे आणि प्रत्येक राशीने या नवरात्रीत कोणत्या देवतेची पूजा केली तर त्यांना उत्तम फळ मिळेल जाणून घेऊया.

NAVRATRI 2025

मेष रास :

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. हे लोक अतिशय धाडसी आणि निश्चयी असतात. या राशीच्या लोकांनी देवी दुर्गेची पूजा करावी.

NAVRATRI 2025

वृषभ रास :

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. सौंदर्य आणि विलासी जीवनाचे प्रतीक ही रास आहे. या राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीची पूजा करणे इष्ट आहे.

NAVRATRI 2025

मिथुन रास :

मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी देवी सरस्वतीची पूजा करावी. ही देवी ज्ञान आणि संवाद कौशल्याची देवता आहे.

NAVRATRI 2025

कर्क रास :

कर्क राशीच्या लोकांचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या लोकांनी देवी पार्वतीची पूजा करावी. देवी पार्वती संवर्धन आणि कुटुंबाची देवता आहे. या राशीचे लोक संवेदनशील असतात. त्यांनी पार्वतीची पूजा करावी.

NAVRATRI 2025

सिंह रास :

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी देवी कालीची पूजा करावी. काली ही बदल आणि शक्तीचे प्रतीक आहे.

NAVRATRI 2025

कन्या रास :

कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीचे लोक कुटूंबवत्सल आणि काळजी करणारे असतात. या लोकांनी देवी अन्नपूर्णेची पूजा करावी.

NAVRATRI 2025

तूळ रास :

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा सौंदर्याचे, प्रेमाचे आणि संतुलनाचे प्रतीक आहे. या राशीच्या लोकांनी देवी रतीची पूजा करावी.

NAVRATRI 2025

वृश्चिक रास :

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. ही रास गुप्तता आणि संरक्षणासाठी ओळखली जाते. या लोकांनी देवी चामुंडेची पूजा करावी.

NAVRATRI 2025

धनु रास :

धनु राशीचा स्वामी गुरु आहे. ही रास तिचं ज्ञान आणि बुद्धिमत्तेची ओळखली जाते. या लोकांनी देवी सरस्वतीची पूजा करावी.

NAVRATRI 2025

मकर रास :

मकर राशीचा स्वामी शनी आहे. हे लोक शिस्तप्रिय आणि स्थिर स्वभावाची प्रसिद्ध असतात. या लोकांनी देवी दुर्गेची पूजा करावी.

NAVRATRI 2025

कुंभ रास :

कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. हे लोक कल्पक आणि बुद्धिमान असतात. या लोकांनी देवी मातंगीची पूजा करावी.

NAVRATRI 2025

मीन रास :

मीन राशीचा स्वामी गुरु आहे. हे लोक काळजी करणारे, बुद्धिमान आणि कुटूंबवत्सल असतात. या लोकांनी देवी लक्ष्मीची पूजा करावी.

NAVRATRI 2025

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारा हा गड, तुम्ही पाहिला आहे का?

shivaji maharaj

येथे क्लिक करा