Monika Shinde
सांगली-सोलापूरच्या सीमेवर वसलेला भूपाळगड हा इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण आहे. दुर्गम पण मनमोहक, हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देतो.
भूपाळगड गाठण्यासाठी कराड–विटा–पळशी किंवा सांगली–भिवघाट मार्गाने जाता येते. स्वतःचे वाहन घेऊन जाणे सोयीचे, कारण रस्ते काहीसे वेडावाकडे आहेत.
भूपाळगड खडकाळ डोंगररांगेत आहे. उंचावर असलेला हा गड उघड्या दगडांनी तयार झाल्यामुळे दूरूनच लक्ष वेधतो. तटबंदी आजही काही ठिकाणी उरली आहे.
गडाच्या परिसरात झाडी कमी, पण दगड आणि पठार यांचे सौंदर्य वेगळेच भासते. माणदेशी वातावरणाची झलक येथे स्पष्टपणे जाणवते.
गडाच्या मध्यभागी एक उंच टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराशेजारी बहिजी नाईक जाधव यांचे स्मारक आहे, जे शिवरायांचे गुप्तहेरप्रमुख होते, असे मानले जाते.
हा गड शिवाजी महाराजांनी बांधल्याचे सांगितले जाते. पुढे फिरंगोजी नरसाळा यांची येथे नेमणूक झाली होती. अनेक ऐतिहासिक लढाया इथे घडल्या आहेत.