Anushka Tapshalkar
रात्रीचे जेवण (डिनर) हे दिवसाच्या शेवटचे आणि महत्त्वाचे जेवण असते. योग्य पद्धतीने केलेले रात्रीचे जेवण झोप चांगली होण्यास, पचनास आणि वजन नियंत्रणास मदत करते. त्याबाबत काही टिप्स बघूया.
झोपेच्या २-३ तास आधी जेवण करा. शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा झोपेच्या वेळी अपचन, गॅस किंवा जडपणा वाटू शकतो. नियमित वेळेत जेवण करण्याचा सराव ठेवा.
‘लाइट’ म्हणजे हलके आणि ‘स्मॉल’ म्हणजे लहान हे मंत्र ठेवा. रात्रीचे जेवण दिवसाच्या सर्वांत हलके जेवण असावे. पोट भरलेले वाटेल इतकेच खा.
सहज पचणारे अन्न जसेकी, भाज्या (वाफवलेल्या किंवा स्ट्यू केलेल्या), सूप, दाल, दही, थोड्या प्रमाणात भात/भाकरी.
जड, तळलेले, मसालेदार, तिखट, गोड पदार्थ आणि जास्त कॅफिन टाळा कारण त्यामुळे पचन बिघडते आणि झोपेवर परिणाम होतो. त्याऐवजी तूप न घातलेली खिचडी, भाज्यांचे सूप आणि हलका सॅलड हे उत्तम पर्याय ठरतात.
जेवणानंतर 10-15 मिनिटे हळू चालावे आणि पाणी पिण्यासाठी किमान अर्धा तास थांबावे, यामुळे पचन सुधारते.
रात्री झोपताना जड आहार घेतल्यास त्रास होऊ शकतो, त्यामुळे हलका आहार निवडावा. झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध (थोडे केसर किंवा हळद घालून) पिणे फायदेशीर ठरते. यामुळे झोप लवकर येण्यास मदत होते.