सोनं कसं तयार झालं? त्याचा शोध कसा लागला?

सकाळ वृत्तसेवा

सोनं पृथ्वीवरचं नाही, आकाशातून आलंय

सोनं म्हणजे केवळ दागिने नाहीत, त्याच्याशी परंपरा आणि इतिहास पण जोडला आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या पृथ्वीवरचं सोनं इथे निर्माण झालेलं नाही तर ते अवकाशातून आलंय.

Gold’s Galactic Origin

|

Sakal

अवकाशातील स्फोटांमधून निर्माण झालं सोनं

वैज्ञानिक सांगतात की सोनं मृत होत असलेल्या तार्‍यांच्या महाविस्फोटांमधून (सुपरनोव्हा) तयार होतं. सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी उल्कापातांच्या पावसात हे सोनं पृथ्वीवर आलं आणि वरच्या भूभागात साचलं.

Gold’s Galactic Origin

|

Sakal

उल्कापिंडांमधून पृथ्वीवर झालं आगमन

त्या काळात उल्कापिंडांच्या तुफानी धडकेत सोनं पृथ्वीच्या क्रस्ट आणि मेंटलमध्ये मिसळलं. आज आपण जे खाणींमधून सोने काढतो, ते या अब्जावधी वर्षांपूर्वीच्या घटनेचंच फलित आहे.

Gold’s Galactic Origin

|

Sakal

भूकंप आणि ज्वालामुखी

भूकंपाच्या वेळी जमिनीखालचं गरम पाणी वर येऊन खडकांवर सोन्याचे थर निर्माण होतात. या नैसर्गिक प्रक्रियांनीही सोनं तयार होण्यास मदत केली.

Gold’s Galactic Origin

|

Sakal

पहिल्यांदा सोन्याकडे माणसाचं लक्ष कसं गेलं?

सोनं कधीही गंजत नाही आणि त्याची चमक कमी होत नाही. हजारो वर्षांपूर्वी लोकांनी ते नदीच्या वाळूत चमकतांना पाहिलं. इजिप्त आणि सिंधू संस्कृतींनी त्याला देवत्व आणि समृद्धीचं प्रतीक मानलं.

Gold’s Galactic Origin

|

Sakal

सत्तेचं आणि सामर्थ्याचं चिन्ह बनलं सोनं

६०० इ.स.पूर्वी लिडिया साम्राज्यानं पहिल्यांदा सोन्याचे नाणे तयार केले. पुढे रोम, चीन आणि भारतापर्यंत सोनं सामर्थ्य आणि संपत्तीचं प्रतीक बनलं.

Gold’s Galactic Origin

|

Sakal

‘गोल्ड रश’ने बदलला जगाचा नकाशा

युरोपीय देशांनी अमेरिकेसारख्या खंडांचा शोध सोन्याच्या लालसेतून घेतला. हजारो लोक सोन्याच्या शोधात आपलं आयुष्य पणाला लावत होते. ‘गोल्ड रश’ने इतिहासच बदलला.

Gold’s Galactic Origin

|

Sakal

सोन्याची किंमत

डिजिटल करन्सी आणि शेअर बाजार असूनही सोन्याचं महत्त्व टिकून आहे. आर्थिक संकटात सोन्यात गुंतवणूक वाढते कारण ती सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

Gold’s Galactic Origin

|

Sakal

भविष्यातही सोनं महत्त्वाचं

भारतासह अनेक देशांचे सेंट्रल बँक डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोनं साठवतात. सोनं फक्त धातू नाही तर ते मानवजातीच्या इतिहासाचं, सामर्थ्याचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे.

Gold’s Galactic Origin

|

Sakal

कार्तिक महिन्यात ‘ही’ डाळ खाणं का टाळलं जातं?

dal

|

Sakal

येथे क्लिक करा