संतोष कानडे
सोन्याच्या गुंतवणुकीला शाश्वत गुंतवणुकीचा दर्जा आहे. कायम परतावा देणारं अॅसेट म्हणून सोन्याकडे बघितलं जातं.
सध्या जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे सोन्याचे भाव कोसळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.
महाराष्ट्रामध्ये सर्वात विश्वासार्ह आणि शुद्ध सोनं कुठे मिळतं, हे बघितलंतर जळगाव हे नाव सर्वात आधी येतं. त्यानंतर मुंबई.
जळगाव शहराला सुवर्णनगरी म्हणजे सोन्याचं शहर असंही म्हटलं जातं. संपूर्ण देशामध्ये जळगावच्या सोन्याची शुद्धता आणि पारदर्शकता मानली जाते.
जळगावचा सराफा बाजार जुना आणि विश्वासार्ह आहे. लग्नसराई किंवा गुंतवणुकीची खरेदी असेल तर लोक जळगावला आवर्जून जातात.
मुंबईचा झवेरी बाजार हा भारतातील सोन्याचं मुख्य केंद्र आहे. देशातील सोन्याचे भाव इथूनच ठरतात.
झवेरी बाजारामध्ये जागतिक दर्जाच्या रिफायनरीतून शुद्ध केलेले २४ कॅरेट सोन्याचे बार आणि बिस्किटं सहज मिळतात.
MMTC-PAMP अशा जागतिक दर्जाच्या सोन्याच्या रिफायनरी आहेत. ते सोनं मुंबईच्या झवेरी बाजारामध्ये सहज मिळतं.
मुंबईला सोन्याचं हब म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या राज्यातील अनेक शहरांमध्ये शुद्धतेचे ब्रँड निर्माण झाले आहेत.
मात्र जळगाव आणि मुंबई हे दोन ठिकाणं जुन्या विश्वासाची आणि ग्राहकांच्या पसंतीची आहेत. सध्या सोनं गुंतवणुकीसाठी चांगला काळ असल्याचं म्हटलं जातं.