संतोष कानडे
होर्मुजच्या समुद्रधुनीत सध्या अनेक देशांचे जहाचं अडकून पडलेले आहेत. त्यामुळे घरातील गॅसपासून वाहनांमधील पेट्रोलपर्यंत टंचाई निर्माण होत आहे.
एरव्हीदेखील होर्मुजच्या समुद्रधुनीतून प्रवास करणं सोप्पं नाही, विविध प्रकारचे शुल्क इराणला अदा करावे लागतात.
मात्र या मार्गाने कुणालाही न कळू देता, गुपचूपपणे जहाचं वाहून नेणं शक्य आहे का? तसं केलं तर काय होईल?
प्रत्येक व्यापारी जहाजाला आपले AIS चालू ठेवणं बंधनकारक असतं. त्यामुळे वेग, स्थान आणि ओळख दिसून येते.
मात्र काही जहाचं आपले एआयएस सिस्टीम बंद ठेवतात. त्यामुळे सॅटेलाईट किंवा ट्रॅकिंगवर ते दिसणार नाहीत. याला गोईंग डार्क असं म्हणतात.
AIS बंद असलेले जहाज रडारवर दिसत नाही, असं नाही. परंतु त्याची ओळख होत नाही. अशा जहाजांवर नौदलाकडून हल्ला होण्याची शक्यता असते.
अशा छुप्या पद्धतीने प्रवास करणारी जहाजं जप्तदेखील केली जातात. त्यामुळे हे धाडस आजकाल कुणी करीत नाही. असंही सध्या होर्मुजमध्ये कडक बंदोबस्त आहे.
इराणने सध्या समुद्रधुनी बंद केली असली तरी काही जहाजांना ते परवाना देतात. इराणच्या प्रादेशिक जलसीमेतून अत्यंत जवळून त्यांचा प्रवास होतो. आंतरराष्ट्रीय नौदलाला येथे हस्तक्षेप करणं कठीण असतं.
जेव्हा काही जहाजांना छुप्या पद्धतीने प्रवास करायचा असतो, तेव्हा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सची छुपी संमती घ्यावी लागते. त्यासाठी मोठी लाच मोजावी लागते.
यासाठी झेंडा बदलण्यापासून ते रडार सिस्टीमध्ये बदल करण्यापर्यंत मजल जाते. मात्र असं करण्याला फार मर्यादा असतात.
असं करायचं असेल तर रात्री, लाईट्स बंद करुन, इंजिनचा आवाज कमी ठेवून आणि रडार सिस्टिममध्ये बदल करुन प्रयत्न केला जातो. अशा जहाजांना मात्र विमा कंपन्या विमा नाकारतात.
होर्मुजच्या समुद्रधुनीची रुंदी सुमारे ३३ ते ३९ किलोमीटर असून प्रत्यक्षात जिथून जहाचं ये-जा करतात ते अंतर ९ ते १० किलोमीटर रुंद इतकं आहे.