Yashwant Kshirsagar
भारतीय परंपरेत सोने हे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ही केवळ गुंतवणूक नाही तर कुटुंबातील महिलांसाठी एक भावना आहे.
महिलांच्या शृंगारातील महत्वाचा धातू आहे. काही लोक याला घरात महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि संपत्ती म्हणून पाहतात.
पण, तुम्हाला माहिती आहे का महिला त्यांच्या घरात किती सोन्याचे दागिने ठेवू शकतात? बँकेच्या लॉकरमध्ये किती सोने ठेवू शकतात? जर तुम्ही सोने मर्यादेपेक्षा जास्त ठेवले तर काय होईल?
जर तुमच्या घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने साठवले असेल आणि त्याचा कोणताही वैध पुरावा नसेल, तर तुम्हाला आयकर कलम 69 B आणि कलम 115 BBE अंतर्गत 78% कर आकारला जाईल.
सीबीडीटीनुसार, विवाहित महिला त्यांच्याकडे ५०० ग्रॅम सोने ठेवू शकतात. अविवाहित महिलांसाठी ही मर्यादा २५० ग्रॅम ठेवण्यात आली आहे. पुरुषांना फक्त १०० ग्रॅम सोने ठेवण्याची परवानगी आहे.
सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या नियमांनुसार, घरी सोने ठेवण्यासाठी पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.
जर तुम्ही घरी निर्धारित मर्यादेत सोने ठेवले तर कोणताही कर भरण्याची आवश्यकता नाही. पण, जर तुम्हाला घरी ठेवलेले सोने विकायचे असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल.
जर तुम्ही सोने ३ वर्षे घरात ठेवल्यानंतर ते विकले तर तुम्हाला त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर २०% दराने दीर्घकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल.