Yashwant Kshirsagar
वास्तू शास्त्रानुसार सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही गोष्टी पाहणे योग्य नसते.
वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठल्यानंतर तुमची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नये
वास्तुशास्त्रानुसार जर सकाळी तुम्ही सूर्य पाहिल्यानंतर पश्चिम दिशेला आपली सावली पाहिली तर ते अशुभ मानले जाते.
झोपेतून उठल्यानंतर कधीही खरकटी भांडी पाहू नयेत, यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक बनते.
सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच आरशासमोर उभे राहू नये.
जर तुम्ही सकाळी आरशात पाहण्याची चूक केली तर यामुळे आरशातील नकारात्मकता तुम्हाला मिळते.
सकाळी उठल्यावर हिंस्त्र किंवा जंगली प्राण्याची पेंटिंग किंवा फोटो पाहू नये, जर बेडरुमध्ये असे काही असेल तर ते बाहेर ठेवा.
(सूचना : हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे, सकाळ याची पुष्टी करत नाही)