Who Decides Gold Price : सोन्याचा दर नेमका कोण ठरवतो? किमतीतील चढ-उतारामागील खरे कारण काय?

सकाळ डिजिटल टीम

भारतीय महिलांकडे सर्वाधिक सोने

भारतीयांच्या दागिन्यांपासून गुंतवणुकीपर्यंत सोन्याला विशेष स्थान आहे. जगभरात भारतीय महिलांकडे सर्वाधिक प्रमाणात सोने असल्याचे मानले जाते.

Who Decides Gold Price

|

esakal

८० टक्के सोने उत्पादन कर्नाटकात

तसेच, भारतात सोन्यात गुंतवणूक करण्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. विशेष म्हणजे देशातील सुमारे ८० टक्के सोने उत्पादन कर्नाटक राज्यात होते.

Who Decides Gold Price

|

esakal

सोन्याची किंमत नेमकी कोण ठरवते?

मात्र, अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो की सोन्याची किंमत नेमकी कोण ठरवते?

Who Decides Gold Price

|

esakal

'स्पॉट रेट' म्हणजे काय?

दररोज बदलणारा सोन्याचा दर नेमका कोण निश्चित करतो, हे अनेकांना माहित नसते. प्रत्यक्षात ज्वेलर्स जे ‘स्पॉट रेट’ म्हणजेच खरेदी दर सांगतात, त्यावर स्थानिक पातळीवरील किंमत ठरते. परंतु हा दर केवळ ज्वेलर्स मनमानीपणे ठरवत नाहीत.

Who Decides Gold Price

|

esakal

सोन्याची किंमत जागतिक बाजारावर अवलंबून

सोन्याची किंमत मुख्यतः जागतिक बाजारातील व्यापारावर अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खरेदी-विक्री, गुंतवणूकदारांची मागणी, तसेच मागणी आणि पुरवठा यांचा थेट परिणाम दरावर होतो.

Who Decides Gold Price

|

esakal

सोन्याच्या किमतीवर कशाचा प्रभाव?

याशिवाय जागतिक चलनवाढ, डॉलरचा दर, आर्थिक अस्थिरता आणि भू-राजकीय परिस्थिती यांचाही सोन्याच्या किंमतीवर प्रभाव पडतो.

Who Decides Gold Price

|

esakal

LBMA संस्था काय करते?

लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) ही संस्था जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, असे मानले जाते. त्यांच्या संदर्भ दरांवरून आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे मूल्य निश्चित होते आणि त्यानुसार विविध देशांतील दर ठरतात.

Who Decides Gold Price

|

esakal

सोन्याच्या किमतीतील चढ-उतारामागील खरे कारण काय?

एकूणच, सोन्याची किंमत ही केवळ स्थानिक बाजारावर नव्हे तर जागतिक आर्थिक घडामोडींवर अवलंबून असते. त्यामुळे दरातील चढ-उतार हा अनेक घटकांच्या एकत्रित परिणामाचा खेळ असतो.

(टीप : ही माहिती सामान्य स्वरूपाची असून आर्थिक सल्ला म्हणून घेऊ नये.)

Who Decides Gold Price

|

esakal

Gold Investment : सोन्यात गुंतवणूक करण्याची 'ही' पद्धत ठरू शकते महाग; 99 टक्के लोकांना याची कल्पनाही नाही!

Gold Investment

|

esakal

येथे क्लिक करा...