आरोग्याच्या ‘या’ समस्यांवर आजीबाईंचा रामबाण उपाय; असा बनवा पौष्टिक डिंकाचा पाक

Aarti Badade

आरोग्यासाठी डिंकाचे महत्त्व

डिंक हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत असून हाडे, अशक्तपणा, मेंदूचे कार्य सुरळीत करतो. हिवाळ्यात शरीराला ऊब आणि ताकद देण्यासाठी हा एक पारंपरिक पौष्टिक पदार्थ आहे.

Dink Pak Healthy winter recipe

|

sakal

आवश्यक साहित्य नोट करा

अर्धा कप डिंक पावडर, २ कप दूध, १ कप मिक्स सुकामेवा, किसलेले खोबरे, खसखस, सुंठ, जायफळ, वेलची पावडर, साजूक तूप आणि गूळ.

Dink Pak Healthy winter recipe

|

sakal

सुकामेवा भाजून घ्या

कढईत थोडे साजूक तूप गरम करून त्यात बदाम, काजू, अक्रोड आणि मखाणे मंद आचेवर खरपूस भाजून घ्या.

Dink Pak Healthy winter recipe

|

sakal

भरड पूड तयार करा

भाजलेला सुकामेवा थोडा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची जाडसर पूड करून घ्या, ज्यामुळे पाकाला छान दाणेदार पोत येतो.

Dink Pak Healthy winter recipe

|

Sakal

खोबरे आणि खसखस परता

त्याच कढईत थोडे तूप घालून खोबरे आणि खसखस किंचित सोनेरी रंगाची होईपर्यंत परता आणि बाजूला काढून ठेवा.

Dink Pak Healthy winter recipe

|

Sakal

डिंक शिजवण्याची पद्धत

कढईत तूप घालून डिंकाची पावडर मंद आचेवर नीट भाजून घ्या आणि त्यानंतर त्यात आधी उकळून थंड केलेले दूध मिसळा.

Dink Pak Healthy winter recipe

|

Sakal

मिश्रण घट्ट होऊ द्या

दूध आणि डिंकाचे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा आणि त्यानंतर त्यात आधी तयार केलेली सुकामेव्याची पूड, खोबरे व खसखस मिक्स करा.

Dink Pak Healthy winter recipe

|

sakal

गुळाचा वापर करा

गोडीसाठी यात किसलेला गूळ घाला आणि मिश्रण सतत ढवळत राहा जोपर्यंत त्यातून बाजूने तूप सुटू लागत नाही.

Dink Pak Healthy winter recipe

|

Sakal

सुगंधी मसाल्यांची जोड

शेवटी सुंठाची पावडर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून सर्व साहित्य नीट एकत्र करा आणि गॅस बंद करा.

Dink Pak Healthy winter recipe

|

Sakal

सेवनाची योग्य पद्धत

हा पौष्टिक डिंकाचा पाक डब्यात साठवून ठेवा आणि रोज सकाळी १ ते २ चमचे खाल्ल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळेल. तुम्ही त्याच्या वड्या सुद्धा करू शकता.

Dink Pak Healthy winter recipe

|

Sakal

मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणारी पंचरत्न मिक्स डाळ; नोट करा 'ही' पौष्टिक रेसिपी

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

येथे क्लिक करा