मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणारी पंचरत्न मिक्स डाळ; नोट करा 'ही' पौष्टिक रेसिपी

Aarti Badade

डाळीचा नवा आणि पौष्टिक अवतार

नेहमीची साधी डाळ खाण्यापेक्षा पाच प्रकारच्या डाळी आणि भाज्यांचे मिश्रण असलेली ही पंचरत्न डाळ आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

लागणाऱ्या पाच प्रकारच्या डाळी

या रेसिपीसाठी मूग, तूर, उडीद, चणा आणि मसूर या पाचही डाळी प्रत्येकी २५ ग्रॅम प्रमाणात एकत्र करा.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

डाळी शिजवण्याची सोपी पद्धत

डाळी १० मिनिटे भिजवून मग कुकरमध्ये हळद, तेल आणि मीठ घालून ३-४ शिट्ट्या करून चांगल्या शिजवून घ्या.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

पौष्टिक भाज्यांची तयारी

डाळ शिजेपर्यंत गाजर, मेथी, फरसबी, सिमला मिरची आणि मटार या भाज्या बारीक चिरून तयार ठेवा.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

खमंग फोडणीची सुरुवात

पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे, राई, हिंग, कढीपत्ता, सुकी लाल मिरची आणि आले-लसूण पेस्ट घालून परता.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

टोमॅटो आणि भाज्यांचा वापर

बारीक चिरलेला टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात चिरलेल्या सर्व भाज्या घालून २-३ मिनिटे तेलात छान परतून घ्या.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

मसाल्यांचा सुवासिक तडका

भाज्यांमध्ये हळद, धणे पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट घालून मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परता.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

डाळ आणि भाज्यांचे एकत्रीकरण

आता कुकरमधील शिजलेली डाळ भाज्यांच्या मिश्रणात ओता आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून एकजीव करा.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

शेवटचा खास टच

डाळीला १० मिनिटे शिजवून त्यात चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घातल्याने डाळीची चव वाढते.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

डाळीला एक उकळी आली की गॅस बंद करून वरून कोथिंबीर पेरा आणि ही डाळ भातासोबत आवडीने खा.

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

sakal

पालक न आवडणारेही खातील! असा बनवा कुरकुरीत पालक पनीर डोसा

Palak Paneer Dosa

|

Sakal

येथे क्लिक करा