Aarti Badade
कारले कडू असल्यामुळे अनेकजण ते खाणे टाळतात.पण क्रिस्पी फ्राय कारली इतकी चविष्ट लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल! चला, झटपट रेसिपी पाहूया.
Sakal
१/४ किलो कारली,१ चमचा लाल मसाला (तिखट),१ चमचा हळद, १ चमचा चाट मसाला,१/२ चमचा काळं मीठ (ब्लॅक सॉल्ट) + चवीनुसार मीठ,२ चमचे बेसन (बेसन पीठ),२ चमचे तांदळाचे पीठ (राईस फ्लोर),तळण्यासाठी तेल
Sakal
सर्वप्रथम कारली स्वच्छ धुऊन घ्या.त्यानंतर कारल्याचे क्रॉसमध्ये पातळ काप (स्लाइस) करून घ्यावे.
Sakal
चिरलेल्या कारल्याच्या कापामध्ये लाल मसाला, हळद, मीठ, काळं मीठ आणि चाट मसाला घालावा.सर्व मसाले कारल्याला चांगले मिक्स करून १० मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
Sakal
१० मिनिटांनंतर त्यात २ चमचे बेसन आणि २ चमचे तांदळाचे पीठ घालावे.कारल्याचे काप पिठामध्ये चांगले एकजीव करावे.
Sakal
गॅसवर कढई ठेवून त्यात तळण्यासाठी तेल चांगले गरम करावे.तेल गरम झाल्यावर गॅस थोडा फास्ट ठेवून पीठ लावलेले कारले चांगले लाल होईपर्यंत क्रिस्पी तळावे.
Sakal
गरमागरम आणि क्रिस्पी फ्राय कारले खाण्यासाठी तयार!ही डिश जेवणाची चव वाढवते आणि पौष्टिक देखील आहे.
Sakal
Nutrients in Broccoli
sakal