Aarti Badade
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी सुकामेवा अत्यंत फायदेशीर आहे. जीवनसत्त्वे, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले हे पदार्थ दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
काजूमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. हे डोळ्यांचे रेटिना मजबूत करून दृष्टी स्पष्ट ठेवण्यास मदत करते.
पिस्तामध्ये ल्युटीन व झेक्सॅन्थिन असतात, जे डोळ्यांना हानिकारक प्रकाशापासून वाचवतात आणि वयाशी संबंधित डोळ्यांचे आजार रोखतात.
बदामांतील व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ डोळ्यांना कोरडेपणापासून वाचवतात आणि नुकसान करणाऱ्या घटकांपासून संरक्षण करतात.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले अक्रोड दृष्टी सुधारण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
मनुकांमध्ये व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांची झिज थांबवून दीर्घकाळपर्यंत चांगली दृष्टी राखतात.
ल्युटीन आणि व्हिटॅमिन A युक्त खजूर डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवतात आणि रेटिनाला बळकटी देतात.