Saisimran Ghashi
नारायण सेठ यांनी 1932 मध्ये घेतलेली ही जागा 1935 मध्ये हाजी हुसेन अली यक्षी यांनी खाद्यप्रेमींसाठी खुली केली.
1935 मध्ये हाजी हुसेन अली यांनी सुरु केलेल्या या ठिकाणी आजही त्यांच्या पारंपरिक पाककृतींचा सुगंध दरवळतो.
विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत बन मस्का आणि गरम चहा हा सकाळचा हा प्रिय नाश्ता आजही कायम आहे.
ऑम्लेट, फ्राय अंडी, स्क्रॅम्बल अंडी आणि बन ऑम्लेट नेहमीच्या पदार्थांमध्येही एक वेगळी चव असते.
चॉकलेट मूस, कॅरमेल पुडिंग आणि कुल्फी स्पेशल आहे. या ठिकाणचा चॉकलेट मूस फाइव स्टार दर्जाचा मानला जातो, जो प्रत्येकजण आवडीने खातो.
'भेजा मसाला’ आणि ‘भेजा चटणी' या अनोख्या डिशेसची चव आजही अनेकांना इथे खेचून आणते.
1989 मध्ये त्यांचा भाऊ कासिम यांनी व्यवसाय सांभाळला आणि पुढे घासेम यांचा प्रवेश झाला.
2001 मध्ये त्यांनी तवा व तंदूरी पदार्थांची भर घालून नव्या पिढीसाठी जागा खुली केली.
फर्ग्युसन, बीएमसीसी, सिम्बायोसिस या कॉलेजजवळचं हे ठिकाण तरुणांच्या गप्पांचं केंद्र बनलं.
अब्बास अली यांच्या आठवणीत देव आनंद, राजेश खन्ना, डेव्हिड धवण यांची उपस्थिती आजही जिवंत आहे.