Saisimran Ghashi
जग तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत असतानाही काही देशांनी कधीही युद्धात सहभाग घेतलेला नाही.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण एक असा देश आहे ज्याने आजवर एकही सैनिक गमावला नाही.
स्वित्झर्लंड हा एकमेव देश आहे ज्यांचा आजपर्यंत एकही सैनिक युद्धात मारला गेलेला नाही.
या देशाने 1815 साली व्हिएन्ना काँग्रेसनंतर 'तटस्थतेचं धोरण' स्वीकारलं.
तटस्थतेचा अर्थ कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघर्षात सहभागी न होणे असा आहे.
गेल्या 200 वर्षांपासून स्वित्झर्लंडने या तत्वाचं काटेकोर पालन केलं आहे.
स्विस लष्कराचं मुख्य उद्दिष्ट देशाचं संरक्षण व सार्वभौमत्व राखणं हेच आहे.
स्विस सैनिकांना केवळ रक्षणासाठी प्रशिक्षण दिलं जातं, आक्रमणासाठी नाही.
या धोरणामुळे स्वित्झर्लंडला युद्धातील प्राणहानीपासून आजपर्यंत वाचता आलं आहे.