Pranali Kodre
१४ फेब्रुवारीपासून वूमन्स प्रीमियर लीग (WPL) या भारतातील महिला क्रिकेट टी-२० लीगला बडोदा येथे सुरुवात होत आहे.
या स्पर्धेचा यंदा तिसरा मोसम असून पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व गुजरात जायंट्स हे दोन संघ आमने-सामने असणार आहेत.
या स्पर्धेत पहिल्या दोन मोसमांप्रमाणेच तिसऱ्या मोसमातही दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स हे पाच संघांत विजेतेपदासाठी रस्सीखेच असणार आहे.
बंगळूर, बडोदा, लखनौ व मुंबई या चार शहरात WPL 2025 स्पर्धेच्या लढती रंगणार आहेत.
१५ मार्च रोजी WPL 205 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडले.
दरम्यान, या स्पर्धेच्या निमित्ताने गुगलन १४ फेब्रुवारी रोजी खास डूडल केलं आहे.
विशेष म्हणजे १४ फेब्रुवारी हा जगभरात व्हॅलेटाईन्स डे म्हणून साजरा होतो, पण यंदा गुगलने WPL साठी डूडल केलं आहे.
या डूडलमध्ये दोन ऍनिमेटेड पक्षी क्रिकेट खेळताना दिसत आहेत.