Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १२ फेब्रुवारीला खेळला गेला. या सामन्यात भारताने १४२ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० ने जिंकली.
या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक केले. त्याने ५५ चेंडूत ५२ धावा केल्या.
या खेळीसह विराटने आशिया खंडात खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा पार केला.
विराट आशिया खंडात १६ हजार धावा करणारा जगातील चौथाच खेळाडू ठरला आहे.
याशिवाय तो सर्वात कमी डावात आशियामध्ये १६ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
विराटने आशिया खंडात ३४० आंतरराष्ट्रीय डावात १६ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकर (३५३ डाव), कुमार संगकारा (३६० डाव) आणि माहेला जयवर्धने (४०१ डाव) यांना मागे टाकले.
विराट व्यतिरिक्त आशिया खंडात १६ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केवळ सचिन तेंडुलकर (२१२६६ धावा), कुमार संगकारा (१८४२३) आणि माहेला जयवर्धने (१७३८६ धावा) यांनीच केल्या आहेत.
विराटच्या १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आशिया खंडात ३४० डावात १६०२५ धावा झाल्या आहेत. यामध्ये ५२ शतकांचा आणि ७९ अर्धशतकांचा समावेश आहे.