गुगलने भारतात लाँच केला 'पिक्सेल 8a'.. पाहा किंमत अन् फीचर्स

Sudesh

पिक्सेल

गुगलने गेल्या वर्षी आपला पिक्सेल 8 स्मार्टफोन लाँच केला होता. याचंच नवीन व्हेरियंट आता गुगलने भारतात लाँच केलं आहे. Google Pixel 8a असं या व्हेरियंटचं नाव आहे.

Google Pixel 8a

डिस्प्ले

या फोनमध्ये 6.1 इंच मोठा OLED Actua डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन मिळतं. पिक्सेल 7a च्या तुलनेत हा डिस्प्ले 40 टक्के अधिक आहे.

Google Pixel 8a

एआय फीचर्स

पिक्सेल प्रमाणे या फोनमध्ये देखील कित्येक एआय फीचर्स दिले आहेत. विशेषतः कॅमेऱ्यासाठी हे फीचर्स कामी येतील. तसंच यात बिल्ट इन जेमिनी सपोर्टही मिळतं.

Google Pixel 8a

बॅटरी

या फोनमध्ये 4,492 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या बॉक्समध्ये 18W चार्जरही दिला जातो. सोबतच याला वायरलेस चार्जिंग सपोर्टही आहे.

Google Pixel 8a

कलर ऑप्शन्स

गुगलच्या पिक्सेल 8a फोनचे चार कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. Aloe, Bay, Obsidian, Porcelain असे चार रंग असणार आहेत.

Google Pixel 8a

कॅमेरा

या फोनला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 64MP+13MP असा सेटअप आहे. सेल्फीसाठी पुढच्या बाजूला 13MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Google Pixel 8a

किंमत

या फोनच्या 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 52,999 रुपये आहे. तर, 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 59,999 एवढी आहे. यासोबत 7 वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स देखील देण्यात येतील.

Google Pixel 8a

ऑफर्स

SBI कार्डने खरेदी केल्यास या फोनवर 4,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसंच जुना फोन एक्सचेंज केल्यावर यात आणखी 9,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल.

Google Pixel 8a

फ्लॅगशिप फीचर्स अन् कॅमेऱ्यामध्ये 'एआय'; मोटोरोलाने लाँच केला खास स्मार्टफोन

moto edge 50 pro | eSakal