फ्लॅगशिप फीचर्स अन् कॅमेऱ्यामध्ये 'एआय'; मोटोरोलाने लाँच केला खास स्मार्टफोन

Sudesh

मोटोरोला

मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन Moto Edge 50 Pro हा आज लाँच केला.

moto edge 50 pro | eSakal

फीचर्स

या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे, याच्या कॅमेऱ्यात खास एआय फीचर्स देण्यात आले आहेत. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच फोन आहे.

moto edge 50 pro | eSakal

किंमत

या फोनच्या 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 31,999 रुपये आहे. तर 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 35,999 रुपये आहे.

moto edge 50 pro | eSakal

ऑफर्स

कार्ड ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सनंतर या फोनवर सुमारे दोन ते अडीच हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसंच लिमिटेड पीरिएड ऑफरमध्ये आणखी 2,000 रुपये सूट मिळत आहे.

moto edge 50 pro | eSakal

बॅटरी

या फोनमध्ये 4,500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. याच्या बेस व्हेरियंटसोबत 68W चार्जर मिळतो, तर टॉप व्हेरियंटसोबत 125W चार्जर मिळतो.

moto edge 50 pro | eSakal

कॅमेरा

या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

moto edge 50 pro | eSakal

फीचर्स

या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 हा अत्याधुनिक प्रोसेसर दिला आहे. तसंच यात 6.7 इंच कर्व्ह्ड pOLED डिस्प्ले मिळतो. याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे.

moto edge 50 pro | eSakal

फीचर्स

या फोनमध्ये 3+4 अशी अपडेट पॉलिसी दिली आहे. तसंच यात मेटल फ्रेम आणि IP68 रेटिंग दिलं आहे. यामुळे हा फोन अगदी मजबूत आणि टिकाऊ ठरतो.

moto edge 50 pro | eSakal

आजच्या दिवशी केला गेला, जगातील पहिला 'मोबाईल' कॉल

First Mobile Call | eSakal