सूरज यादव
ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या सातबाऱ्यावर खासगी व्यक्तींची नावं असल्यानं सध्या वाद सुरू आहे. यामुळे गोपाळगड किल्ला चर्चेत आलाय.
Gopalgad Fort
Esakal
गोपाळगड हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजनवेल गावाजवळ आहे. वाशिष्ठी नदी आणि दाभोळ खाडीवर नजर ठेवण्यासाठी हा बांधला होता.
Gopalgad Fort
Esakal
सुरुवातीच्या काळात हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. १६६० ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून किल्ल्याला गोपाळगड नाव दिलं.
Gopalgad Fort
Esakal
१६९९ मध्ये सिद्धी खैरात खानने तर १७४५ मध्ये तुळाजी आंग्रेंनी किल्ला जिंकला. पुढे पेशव्यांच्या ताब्यात किल्ला गेला.
Gopalgad Fort
Esakal
मराठी सत्तेच्या काळात महत्त्वाचा किल्ला राहिलेल्या गोपाळगडावर १८१८ पासून स्वातंत्र्यापर्यंत सव्वाशे वर्षे ब्रिटिशांचं नियंत्रण होतं.
Gopalgad Fort
Esakal
गोपाळगडमधील जमीन ही १९६५ मध्ये लिलावातून काही लोकांना मिळाली. तेव्हा जे गट नंबर दिले गेले त्या ठिकाणी किल्ला होता.
Gopalgad Fort
Esakal
१९६५ पासून आजपर्यंत ती खासगी मालकीची आहे. २०१६ मध्ये हा किल्ला राज्य संरक्षित झाल्यानं तो सुरक्षित आहे.
Gopalgad Fort
Esakal
सध्या किल्ल्यावर आंब्याच्या कलमांचं उत्पादन संबंधित लोक घेतायत. भूसंपादन झाले की योग्य मोबदला घेऊन ते बाहेर पडतील असं पुरातत्व विभागाने म्हटलंय.
Gopalgad Fort
Esakal
First petrol pump in india
Esakal