Aarti Badade
कृष्णाला आवडणाऱ्या दही, दूध, तूप यांचा वापर करून घरच्या घरी सोपी व चविष्ट रेसिपी.
पोहे (भिजवून) , ज्वारीच्या लाह्या , साळीच्या लाह्या , चिरमुरे , दही , दूध , हिरव्या मिरच्या , आल , सैंधव मीठ
डाळिंब दाणे , सफरचंद , तूप , साखर , ओले खोबरे , कोथिंबीर , ड्रायफ्रूट्स
पोहे स्वच्छ धुऊन भिजवून घ्या.
त्यात दही, दूध, सैंधव मीठ घालून मिक्स करा.
उपलब्ध फळांचे काप बाजूला ठेवा.
तुपात मिरचीची फोडणी करून पोह्यात टाका.
त्यात आल, कोथिंबीर, खोबरे घाला.
नंतर लाह्या व चिरमुरे मिसळा.
फळांचे काप घालून हलवा.
वरून डाळिंबाचे दाणे व ड्रायफ्रूट्स पेरा.
झालं! तयार आहे चवदार व पौष्टिक गोपाळकाला.
गोपाळकाला घरच्या घरी बनवा आणि सणाला खास गोडवा द्या!