सकाळ डिजिटल टीम
धर्मात गोपाष्टमी हा सण अत्यंत पवित्र मानला जातो, जो विशेषतः गोमाता आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अतूट नात्याशी जोडलेला आहे.
Gopashtami; Why It Is Celebrated & Story of Lord Krishna
sakal
हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला, म्हणजेच आज १७ नोव्हेंबरला मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे.
Gopashtami; Why It Is Celebrated & Story of Lord Krishna
sakal
गोपाष्टमीच्या दिवशी घरोघरी आणि गोशाळांमध्ये गाई आणि त्यांच्या वासरांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांची मनोभावे पूजा केली जाते.
Gopashtami; Why It Is Celebrated & Story of Lord Krishna
sakal
पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने बालपणी पहिल्यांदाच वासरांऐवजी मोठ्या गाई चारण्यासाठी घराबाहेर पाऊल ठेवले होते.
Gopashtami; Why It Is Celebrated & Story of Lord Krishna
sakal
नंद महाराज आणि यशोदा मातेच्या विनंतीवरून शांडिल्य ऋषींनी गाई चारण्यास सुरुवात करण्यासाठी कार्तिक शुद्ध अष्टमीचा हा शुभ दिवस निश्चित केला होता.
Gopashtami; Why It Is Celebrated & Story of Lord Krishna
sakal
गाईंचे पालन आणि रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळेच या दिवसापासून भगवान श्रीकृष्ण 'गोपाळ' या नावाने ओळखले जाऊ लागले.
Gopashtami; Why It Is Celebrated & Story of Lord Krishna
sakal
दुसऱ्या मान्यतेनुसार, श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून ब्रजवासीयांचे रक्षण केले आणि अष्टमीच्या दिवशी इंद्रदेवाने आपला पराभव स्वीकारला होता.
Gopashtami; Why It Is Celebrated & Story of Lord Krishna
sakal
गोपाष्टमीला गाईंना हिरवा चारा, गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे.
Gopashtami; Why It Is Celebrated & Story of Lord Krishna
sakal
भल्या पहाटे गावोगावी काकड आरती का केली जाते?
Kakad Aarti: Morning Prayer Tradition
sakal