Apurva Kulkarni
साथ निभाना साथिया मालिकेतील गोपी बहु म्हणजेच जिया मानेक ही विवाह बंधनात अडकली आहे.
जियाने वरुन जैन सोबत लग्न केलं आहे. तिने तिच्या स्माईलमधून वरुनचं हृदय चोरलंय.
जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. त्यात वरुन आणि जिया दोघेही खुश दिसत होते.
या फोटोमध्ये जिया गोल्डन कलरची साडी परिधान केलीय. तर त्याच कलरमध्ये वरुनने कुर्ता परिधान केला आहे.
या फोटोमध्ये दोघेही खुप खुश दिसत आहेत. जियाचा सिंपल मेकअप तिच्यावर प्रचंड उठून दिसत आहे.
सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांना लग्नाचे फोटो पाहून धक्का बसला आहे.
चाहते जियाच्या फोटोवर कमेंट्स करत शुभेच्छाचा वर्षाव करताय.