Aarti Badade
लाल मिरची म्हटले की अनेकांच्या डोळ्यांसमोर येते ती घरगुती तिखट चव आणि आजीच्या हातचं जेवण!
तिखट असूनही लाल मिरची आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक रोगांपासून बचाव करते.
लाल मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचं संयुग असतं जे चयापचय वाढवतं आणि भूक कमी करतं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
लाल मिरचीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन A असतं जे दृष्टी सुधारतं आणि रात्रीच्या अंधत्वावर परिणामकारक असतं.
कॅप्सेसिनमुळे कोलेस्टेरॉल कमी होतो, रक्त गुठळ्या बनत नाहीत आणि हृदय निरोगी राहतं.
लाल मिरची पचनरस वाढवते, पचनक्रिया गतिमान करते, गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
लाल मिरचीमध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि A त्वचेचं कोलेजन वाढवतं आणि केसांना पोषण देतं.
लाल मिरचीतील व्हिटॅमिन E त्वचेला तरतरीत ठेवतं, वृद्धत्वाची चिन्हं कमी करतं.
तिखट वाटत असली तरी लाल मिरचीचे फायदे ऐकून तुम्ही नक्कीच ती आहारात समाविष्ट कराल!
लाल मिरचीची मात्रा योग्य ठेवा. अति सेवन टाळा, पण नियमित वापर फायद्याचाच!