छातीत कफ अन् रात्रभर खोकला? मग आजीचे ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा

Anushka Tapshalkar

छातीत कफ साचलाय?

ऋतू बदलताना सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि छातीत कफ साचण्याचा त्रास वाढू शकतो. काही घरगुती उपायांमुळे घशाला आराम मिळण्यास आणि कफ सैल होण्यास मदत होऊ शकते.

Cough in Chest

|

sakal

आले-मधाचा उपाय

एक चमचा मधामध्ये थोडे किसलेले आले मिसळा. हे मिश्रण थोड्या प्रमाणात घेता येते. हवे असल्यास कोमट पाण्यात मिसळूनही घेऊ शकता.

Honey Ginger Remedy

|

sakal

मध आणि काळी मिरी

एक चमचा मधामध्ये चिमूटभर काळी मिरी मिसळा. खोकल्यामुळे होणारी घशाची खवखव कमी करण्यासाठी हा पारंपरिक उपाय वापरला जातो.

Honey and Black Pepper Remedy

|

sakal

वाफ घ्या

कफामुळे नाक किंवा घसा चोंदला असल्यास वाफ घेतल्याने स्राव सैल होण्यास मदत होऊ शकते. मात्र, अतिशय गरम वाफ घेणे टाळा.

Nebulization

|

sakal

कोमट पाण्याच्या गुळण्या

घशात खवखव किंवा चिकटपणा जाणवत असल्यास कोमट पाण्याच्या गुळण्या करा. यामुळे घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

Gargling with Luke Warm Water

|

sakal

भरपूर द्रवपदार्थ घ्या

कोमट पाणी आणि इतर द्रवपदार्थ घेत राहिल्याने घसा ओलसर राहण्यास मदत होते. मात्र, कफ कमी करण्यासाठी कोणताही घरगुती उपाय हमखास काम करतोच असे नाही.

Liquid Food

|

sakal

डॉक्टरांचा सल्ला

कफ किंवा खोकला दीर्घकाळ टिकत असेल, ताप, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे किंवा रक्तमिश्रित कफ दिसत असेल तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Doctor's Advice | sakal

फक्त स्वयंपाकासाठी नाही! त्वचा आणि केसांसाठीही गुणकारी आहे मसूर डाळ

Lentils for Skin and Hair

|

sakal

आणखी वाचा