Aarti Badade
कोहळा थंड आणि पचायला हलका असतो. तो मेंदूला थंडावा देतो, झोप सुधारतो आणि मानसिक ताण कमी करायला मदत करतो.
दुधीमध्ये पाणी भरपूर असते. त्यामुळे शरीर थंड राहते आणि चिडचिड कमी होते.
खसखस एक नैसर्गिक स्लीपिंग पिल (झोपेची गोळी) आहे. रात्री खाल्ल्यास चांगली झोप लागते आणि ताण कमी होतो.
दुधी हलवा गोड असला तरी हलका असतो. मेंदूला थोडी साखर मिळाल्यास तो रिलॅक्स होतो. पण तो थोडाच खावा.
बदाम हे मेंदूचे उत्तम मित्र आहेत. ते शक्ती आणि शांतता दोन्ही देतात. रोज एक चमचा पुरेसा आहे.
सफरचंदात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते मेंदूला ताजेतवाने ठेवतात आणि नैराश्य दूर करतात.
हा आजीबाईंचा पारंपरिक उपाय आहे. कोहळेपाक पचन सुधारतो, शरीर थंड ठेवतो आणि मानसिक ताणात खूप उपयुक्त आहे.
रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले दूध प्यायल्याने शरीर रिलॅक्स होते आणि मेंदूला आराम मिळतो.