Aarti Badade
मानसिक क्षमता वाढवण्यासाठी शारीरिक हालचाली, मानसिक कोडी, नवीन कौशल्ये शिकणे आणि ध्यान यांचा समावेश.
नियमित मेंदूचे व्यायाम स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारतात. कोडी, शब्दकोडे, मेमरी गेम्स खेळणे फायदेशीर.
मेंदूला आव्हान देणारे व्यायाम विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवतात.
ध्यान आणि विश्रांतीचे व्यायाम तणाव कमी करून मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
नवीन भाषा किंवा कौशल्ये शिकल्याने मेंदू नवीन माहितीवर प्रक्रिया करण्यास शिकतो.
नियमित व्यायाम मेंदूला अधिक कार्यक्षम बनवतो आणि वाढत्या वयानुसार होणारी मानसिक घट टाळतो.
चालणे, धावणे, नृत्य, सायकल चालवणे यांमुळे मेंदूला रक्तपुरवठा सुधारतो, कार्यक्षमता वाढते.
क्रॉसवर्ड, जिगसॉ, सुडोकू यांसारखी कोडी सोडवा, विचारशक्ती वाढवा.
मित्र-कुटुंबासोबत वेळ घालवणे, खेळ खेळणे, सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होणे मेंदूसाठी फायदेशीर.
एकाग्रता वाढवते, स्मरणशक्ती सुधारते आणि तणाव पातळी कमी करते.