सकाळ डिजिटल टीम
फळांप्रमाणेच काही वनस्पतींची पानेसुद्धा शरीरासाठी औषधासारखी कार्य करतात. त्यापैकीच एक म्हणजे द्राक्षाची पाने.
आयुर्वेदात या पानांना विशेष स्थान आहे. चवीनं ती थोडी तुरट आणि आंबट असली तरी त्यांचे आरोग्यवर्धक गुण अतिशय प्रभावी आहेत.
द्राक्षाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फायबर, पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळतात. ही सर्व तत्त्वे शरीरासाठी पोषणदायी आणि संरक्षणात्मक मानली जातात.
कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने द्राक्षाची पाने नियमित खाल्ल्यास हाडे मजबूत राहतात. हाडे कमकुवत होण्याची किंवा लवकर दुखावण्याची समस्या कमी होते.
द्राक्षाच्या पानांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन-सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरीत्या वाढते. त्यामुळे हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
लोहाच्या भरपूर प्रमाणामुळे द्राक्षाची पाने रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि ऊर्जा वाढते.
फायबरयुक्त असल्याने द्राक्षाची पाने पचन सुधारतात. बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होण्याच्या तक्रारी असणाऱ्यांसाठी ही पाने अत्यंत फायदेशीर आहेत.
व्हिटॅमिन-ए च्या उपस्थितीमुळे दृष्टीसंबंधी समस्या कमी होतात आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
थोडक्यात, द्राक्षाची पाने ही नैसर्गिक पोषणाचा खजिना असून, रोजच्या आहारात त्यांचा समावेश केल्यास शरीराचे एकंदर आरोग्य सुधारते.