संतोष कानडे
एकदा एक साथीदार निवडला की आयुष्यभर त्याच्यासोबतच राहणारा एक पक्षी आहे.
आजकाल माणसांमध्येही प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कमी झालेला आहे. त्यात हा पक्षी म्हणजे निव्वळ आश्चर्य
हा पक्षी म्हणजे धनेश. लांब, आकर्षक पिवळी चोच असलेला धनेश. संपूर्ण आयुष्य एकाच जोडीदारासोबत काढणारा पक्षी
याच धनेशला इंग्रजीमध्ये ग्रेट हॉर्नबिल असंही म्हणतात. भारतामध्ये या पक्षाच्या ९ वेगवेगळ्या जाती आढळून येतात.
मात्र या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात येऊ पहात आहे. धनेश नामशेष होऊ नये, यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
अरुणाचल प्रदेशात मात्र धनेशच्या संवर्धनासाठी काम सुरु आहे. काही आदिवास या पक्षासाठी काम करतात.
अरुणाचल प्रदेशातील नॅशनल रिझर्व्ह फाऊंडेशन ही संस्था ग्रेट हॉर्नबिलसाठी काम करते.
इतका आकर्षक आणि दुर्मिळ पक्षी टिकावा, यासाठी महाराष्ट्रातही काही लोक काम करतात.