भारतातील सर्वात सुंदर शहर.. जगभरातल्या पर्यटकांना पडते भूरळ

संतोष कानडे

पूर्वेकडील व्हेनिस

ज्या शहराला 'पूर्वेकडील व्हेनिस' म्हटलं जातं ते राजस्थानातील उदयपूर हे शहर. शहरात असलेली तलावं आणि राजवाडे अलौकिक आहेत.

उदयपूर

येथे जगातल्या सर्वौत्तम गोष्टी एकवटलेल्या आहेत. त्यामुळे हे शहर तसं महागडंदेखील आहे. तरीही जीवनात एकदा तरी या शहराला भेट द्यावीच.

ताज लेक पॅलेस

लेक पिपोला या तलावाच्या मध्यभागी असलेला 'ताज लेक पॅलेस' पाहणे म्हणजे स्वप्नवत अनुभव आहे.

सिटी ऑफ लेक्स

हा पॅलेस बघण्यासाठी खास बोटीतून प्रवास करावा लागतो. तलावांमुळे या शहराला सिटी ऑफ लेक्स असंही म्हणतात.

सिटी पॅलेस

भव्य सिटी पॅलेस म्हणजे निव्वळ अविश्वसनिय. मेवाडच्या राजांचे हे निवासस्थान राजस्थानी आणि मुघल वास्तुकलेचा अद्भूत नमुना आहे.

बाग

'सहेलियों की बाडी' ही वास्तू राणी आणि तिच्या मैत्रिणींसाठी बनवलेली बाग होती. कमळांचं तलाव आणि कारंजासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

रॉयल गाड्या

जुन्या काळातल्या रॉयल गाड्यांची तुम्हाला आवड असेल तर विंटेज कार संग्रहालय नक्की बघा. मेवाडच्या राजांचे हे कलेक्शन आहे.

फत्तेह सागर

सायंकाळच्या वेळी उदयपूरमध्ये फत्तेह सागर लेक नक्की बघा. येथे बोटिंगचा मनमुराद आनंद घेता येतो.

धरोहर

राजस्थानी संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर बागोर की हवेली येथे धरोहर लोकनृत्याचा कार्यक्रम असतो.

दाल बाटी

दाल बाटी आणि चुरमा हे मिस करु नका. शिवाय अस्सल राजस्थानी थाळीचाही आस्वाद घ्याच.

आलिशान हॉटेल्स

उदयपूरमध्ये जगातील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक 'ओबेरॉय उदयविलास' आहे. येथे एका रात्रीचे भाडे ५०,००० रुपयांपासून ते काही लाखांपर्यंत आहे.

भारतातील पाच सर्वात स्वस्त टुरिस्ट ठिकाणं

<strong>येथे क्लिक करा</strong>